कु. पार्श मनोज चुरी हा डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी येथील दुसऱ्या वर्षाचा बी.डी.एस. (BDS) चा विद्यार्थी आहे. त्याने त्याच्या अभ्यासक्रमासोबतच “Application of AI in Dental Epidemiology for Automated Data Collection and Analysis in Large-Scale Surveys” या विषयावर एक पेटंट मिळवले आहे. या संशोधनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून दंत-आरोग्य विषयक मोठ्या प्रमाणातील माहिती गोळा करणे आणि त्याचे विश्लेषण करणे हे स्वयंचलितपणे (automated) केले जाते. यामध्ये विशेषतः डिजिटल टूल्स व AI आधारित प्रणाली वापरून ग्रामीण भागातील लोकांकडून दंत-आरोग्याची माहिती गोळा केली जाते. ही माहिती वेगाने आणि अचूकतेने संकलित होऊन त्याचे विश्लेषण केले जाते, जेणेकरून स्थानिक आरोग्य धोरणे अधिक प्रभावीपणे ठरवता येतील. हा उपक्रम ग्रामीण भागातील लोकांना मोठ्या प्रमाणावर मदत करणार आहे, कारण तिथे दंततज्ज्ञांची कमतरता असते आणि सर्वेक्षणासाठी लागणारा वेळ व संसाधने मर्यादित असतात. AI आधारित ही प्रणाली वेळ, श्रम आणि खर्च वाचवून अधिक अचूक आणि सुलभ माहिती उपलब्ध करून देईल, ज्यामुळे लोकांचे दंत-आरोग्य सुधारण्यास मदत होईल.