आज शुक्रवार दि 20/12/24 रोजी लोकनेते अण्णासाहेब वर्तक आरोग्यधाम व ढवळे हाँस्पिटल पालघर ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्यधाम केळवेरोड येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ह्या शिबिरात परीसरातील 110 रुग्णांनी आरोग्य तपासणी केली व गरजू रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली. ह्याप्रसंगी संघाचे कार्यकारी विश्वस्त श्री सुरेश वर्तक, विश्वस्त सौ नमिता राऊत, संघाचे चिटणीस श्री विविध पाटील, वैद्यकीय सल्लागार डॉ भार्गव ठाकूर, डॉ विलास सावे , विश्रामधाम समितीप्रमुख श्री अशोक राऊत, ढवळे हाँस्पिटलचे डॉ अभिजित त्यांची टीम व परीसरातील मान्यवर उपस्थित होते. आरोग्यधामाचे कार्यवाह श्री पंकज म्हात्रे ह्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन आरोग्यधामाच्या कार्याची माहीती दिली व समिती प्रमुख श्री जितेंद्र राऊत ह्यांनी आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी मदत करणार्या सर्वांचे आभार व्यक्त केले👍