विधीश जयेश राऊत याने आपल्या अथक परिश्रम, जिद्द, शिस्त आणि योगसाधनेप्रती असलेल्या समर्पणाच्या बळावर जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आता जागतिक स्तरावर सुवर्ण यश संपादन करत पालघर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. मर्यादित साधनसुविधा आणि अनेक अडचणींवर मात करत त्याने मिळवलेले हे यश असंख्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. कुटुंबीयांचे पाठबळ, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची चिकाटी यांच्या जोरावर त्याने सिद्ध केले की, प्रामाणिक प्रयत्न आणि दृढ इच्छाशक्ती असेल तर कोणतेही स्वप्न अशक्य नसते. विधीशची ही सुवर्ण झेप केवळ त्याच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण पालघर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असून भविष्यातही तो अशाच उंच शिखरांवर पोहोचो, हीच सर्वांची अपेक्षा आहे.