शोकसभा कुटुंबीय मंगळवार, दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी २:३० या वेळेत "लोकमंगलम हॉल" (मराठी शाळा) मथाणे येथे उपस्थित राहणार आहेत. तसेच सो. क्ष. स. संघाचे माजी अध्यक्ष, प्रगत शेती चळवळीचे एक प्रणेते आणि केसरी टूर्स चे संस्थापक सहल सम्राट कै. केसरीभाऊ रावजी पाटील यांना शनिवार दि. १५ फेब्रुवारी २०२५ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी वृद्धापकाळाने देवाज्ञा झाली. समाज एका निस्सीम व उत्तुंग व्यक्तिमत्वाला पोरका झाला. अशा ह्या बहुआयामी व्यक्तिमत्वाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यासाठी सो. क्ष. स. संघ आणि सो. क्ष. स. संघ फंड ट्रस्ट च्या संयुक्त विद्यमाने शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. आपण या सभेस अवश्य उपस्थित राहावे. स्थळ : विश्रामधाम, केळवेरोड मंगळवार दि. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.०० ते ५.०० वाजेपर्यंत. ( मथाणे येथे होणाऱ्या ११.०० ते ३.०० सांत्वन कार्यक्रमानंतर संघ व फंड ट्रस्ट ची शोकसभा होईल.)