"वाडवळ आयडॉल लिटिल चॅम्प्स २०२५" या स्पर्धेवर आधारित एक कविता सादर करत आहे. वाडवळ आयडॉल लिटिल चॅम्प्स २०२५ सोमवंशी क्षत्रिय संघाने मांडला एक सूर नवा, कला संस्कृतीचा मेळ केळवे शाखेने सजवला. अध्यक्ष भाईसाहेब राऊत नेतृत्व त्यांचे भारदार, शितलाई मंगलधामी शुरूं झाला सूरबहार. ज्येष्ठ कवी आर एम आप्पा स्मरणार्थ बक्षिसे दिली, यूट्यूब लाईव्ह चित्रीकरण सगळीकडे गाजली. डॉ. नरेश हरिश्चंद्र सावे अध्यक्ष स्थानी विराजमान, विकास रघुनाथ पाटील उद्घाटक बनून आले सन्मान. दीपप्रज्वलन होताच कार्यक्रमाची झाली सुरुवात, परीक्षक सिद्धेश जाधव हर्षाली मुकणे, यांच्या स्वागतात वाडवळ आयडॉलचे विजेते गाऊनी गेले सुरेख गाणे, "तुज मागतो मी आता" सुरूं झाले गोड तराणे. ऐकहत्तर स्पर्धकांमधून एकवीस निवडले गेले, कोड नंबर देऊन पारदर्शकतेने खेळले. एकसे एक गाणे गाऊन परीक्षक झाले दंग, प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर उत्सुकतेचा चढला रंग. कवी आर एम आप्पांचे "माया आजोबा वाडवळ भोळा", प्रदीप म्हात्रे यांनी गायले पेहराव सुंदर, रंग हिरवा मळा. संपूर्ण कुटुंब उपस्थित एकजुटीचा दिसला देखावा, मनोगत व्यक्त करताच आयोजनाचा गौरव व्हावा. मनोज वर्तक यांनी मानले आभार, सुलंजना सावे, विनय पाटील आयोजनात त्यांचा भार. हर्षल राऊत, स्वरूपा सावे, विशाल पाटील, विविध पाटील, सर्वांचे सहकार्य, एकत्र येऊन केले काम कार्यक्रमाला आले चैतन्य. डॉ. संपदा पोतदार यांनी अखेरची निवड केली, कुशल वर्तक, प्रणाली म्हात्रे त्यांना साथ दिली. आदेश राऊतचे आकर्षक बॅनर वाडवळांसाठी किती हा ऑनर प्रसिद्धीसाठी प्राप्तीचा व्हिडिओ, त्यात होता छान छान ऑडिओ रूपाली पाटील, प्रशांत चुरी यांचे सूत्रसंचालन लयच भारी चेतन वर्तकचे सुंदर चषक विजेत्यांसाठी केले तयार, कुशल, योगेश वर्तक तंत्रज्ञान सांभाळले फार. मयुरेश चुरीचे क्षणचित्रे प्रत्येक चेहऱ्यावर हास्य, सर्वांच्या मेहनतीचे फळ कार्यक्रम झाला भव्य. क्षण महत्त्वाचा आला निकाल होता सांगायचा, टाळ्यांच्या गजरात आनंद होता व्हायचा. शार्वी चंदन वर्तक, उमेळे - प्रथम, अद्विती प्रीत पाटील, बोर्डी - द्वितीय, पर्ल भूषण वर्तक, आगाशी - तृतीय. उत्तेजनार्थ सिआ सौरभ सावे, आणि परी सुधीर चुरी पण बाकीचे स्पर्धकही होते भारी अभिनंदन सर्वांचे पसायदानाने झाली सांगता पुरी. कवी श्री प्रशांत नरेंद्र पाटील ( माकुणसार) दहिसर शाखा