Home > Entertainment > वाडवळ आयडॉल लिटिल चॅम्प्स २०२५

वाडवळ आयडॉल लिटिल चॅम्प्स २०२५

loading...
वाडवळ आयडॉल लिटिल चॅम्प्स २०२५

वाडवळ आयडॉल लिटिल चॅम्प्स २०२५ सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ आयोजित आणि कला सांस्कृतिक समिती व केळवे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच संघाचे अध्यक्ष माननीय श्री. नरेश जनार्दन तथा भाईसाहेब राऊत यांच्या नेतृत्वाखाली "वाडवळ आयडॉल लिटिल चॅम्प्स २०२५" ही स्पर्धा दिनांक ८ जून २०२५ रोजी दुपारी दोन वाजता शितलाई मंगलधाम हॉल केळवे येथे घेण्यात आली. केळवे येथील ज्येष्ठ साहित्यिक व कवी रघुनाथ माधव पाटील उर्फ आर एम आप्पा यांच्या स्मरणार्थ विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आली. या कार्यक्रमाचे चित्रीकरण यूट्यूबवर लाईव्ह दाखवण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉ. श्री.नरेश हरिश्चंद्र सावे व उद्घाटक माननीय श्री विकास रघुनाथ पाटील होते. संघाचे उपाध्यक्ष, विश्वस्त व चिटणीस देखील उपस्थित होते. मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात केली. मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक माननीय श्री. सिद्धेश जाधव व माननीय सौ. हर्षाली लोखंडे मुकणे यांचे स्वागत करण्यात आले. वाडवळ आयडॉल २०२४ चे विजेते हे देखील स्पर्धेचे मानकरी होते. त्यांनी आपल्या बहारदार गीतांनी स्पर्धेची सुरुवात केली. "तुज मागतो मी आता" या सुंदर गीताने कार्यक्रमाचा श्रीगणेशा करण्यात आला. प्रथम फेरीतील ७१ स्पर्धकांमधून २१ स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. हे सर्व स्पर्धक चुरशीसाठी तयार होते. स्पर्धेची पारदर्शकता अबाधित राखण्यासाठी सर्व स्पर्धकांना कोड क्रमांक देण्यात आले होते. सर्व स्पर्धकांनी एक से एक गाणे गाऊन परीक्षकांना संभ्रमात टाकले होते. प्रेक्षकांचा सुंदर प्रतिसाद मिळाला होता. सर्वांची निकालाबाबतची उत्सुकता चेहऱ्यावर दिसत होती. माननीय कवी आर एम आप्पा यांची सुंदर रचना "माया आजोबा वाडवळ भोळा त्याने उगवला हिरवा मळा" हे गाणे गाण्याचा मान समिती सदस्य प्रदीप म्हात्रे यांना मिळाला. त्यांनी फार सुंदर पेहराव घालून व गाणे गाऊन या गाण्याची उंची वाढवली. उपस्थित प्रत्येकाने यात सहभाग घेतला.रघुनाथ माधव पाटील यांचे संपूर्ण कुटुंबिय या कार्यक्रमात उपस्थित होते. काही स्पर्धक व पालक यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि कार्यक्रमाचे सुंदर आयोजन असे कौतुक केले. श्री. मनोज वर्तक यांनी आभार प्रदर्शन केले. कला व सांस्कृतिक समिती च्या समन्वयक सौ सुलन्जना सावे यांनी देखील कार्यक्रमाच्या आयोजनाकडे स्वतः लक्ष दिले समिती प्रमुख श्री विनय पाटील यांनी खूप छान कार्यक्रम पार पाडला. कामाची देखरेख पाहुण्यांची सरबराई तसेच स्टेजवरील व स्टेज मागील सर्वच कामे कुशल पणे पार पाडली. केळवा शाखा अध्यक्ष श्री हर्षल राऊत , उपाध्यक्षा स्वरूपा सावे व शाखाचिटणीस श्री विशाल पाटील यांनी कार्यक्रमासाठी भरपूर सहकार्य केले. संघ चिटणीस श्री. विविध पाटील यांनीही समितीला सहकार्य केले. माननीय परीक्षक डॉ. संपदा पोतदार यांनी प्रथम फेरीतील ७१ स्पर्धकांमधून २१ स्पर्धक निवडले. त्यांना कुशल वर्तक व प्रणाली म्हात्रे यांनी सहकार्य केले. या सुंदर कार्यक्रमाचे आकर्षक बॅनर आदेश राऊत यांनी केले होते. सूत्रसंचालनाची जबाबदारी रूपाली पाटील व प्रशांत चुरी यांनी सुंदर रित्या पार पाडली. चेतन वर्तक यांनी विजेत्या स्पर्धकांसाठी सुबक चषक स्वतः बनवले. प्रसिद्धीसाठी प्राप्ती राऊत यांनी सुंदर व्हिडिओ बनवून कार्यक्रमाची गर्दी खेचून आणली होती. तांत्रिक व्यवस्था तसेच युट्युब लाईव्ह अशी स्टेजच्या मागील कामांचे व्यवस्थापन कुशल वर्तक व योगेश वर्तक यांनी पार पाडले. सर्व सदस्यांनी कार्यक्रम व्यवस्थित होण्यासाठी खूप मेहनत घेतली. या सर्व कार्यक्रमाचे क्षण टिपणारे श्री मयुरेश चुरी समोर येतात प्रत्येक चेहऱ्यावर हास्य येत होते. या स्पर्धेचा महत्वाचा क्षण म्हणजे निकाल सांगण्यात आला. प्रथम: शार्वी चंदन वर्तक, उमेळे द्वितीय: अद्विती प्रीत पाटील, बोर्डी तृतीय: पर्ल भूषण वर्तक,आगाशी उत्तेजनार्थ १: सिआ सौरभ सावे, दहिसर उत्तेजनार्थ २: परी सुधीर चुरी, माहिम सर्व स्पर्धकांचे खुप खुप अभिनंदन. शेवटी पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

loading...
loading...
loading...
loading...
loading...
loading...
loading...
loading...
loading...
loading...
loading...
loading...
Comments

खूपच सुंदर कार्यक्रम

Sponsored Ads

...
...
...
...
Entertainment

Category

Sports      Education      Weather      Entertainment      Politics      Business      Economics      Health      Sad Demise      Current Affairs      Festive      Achievements     
Recent News

logo
Download our app by clicking the link below :
logo logo
© 2024 SKS Connect | All Rights Reserved | Powered By OTET Infosystems