1 December 2024
4:00 PM
के. जी. हायस्कूल, आगाशी
17 Post
सोमवंशी क्षत्रिय युवक मंडळ, आगाशी आयोजित महिला क्रिकेट स्पर्धा आणि वाडवळी खाद्य महोत्सव २०२४ (शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थांचा मेळावा) सोमवंशी क्षत्रिय युवक मंडळ, आगाशीच्या वार्षिक कार्यक्रमांतर्गत डिसेंबर महिन्यात महिला क्रिकेट स्पर्धा आणि वाडवळी खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या वर्षीही मंडळाने रविवार दिनांक १ डिसेंबर २०२४ रोजी के. जी. हायस्कूल, आगाशी येथे महिला क्रिकेट आणि खाद्यमहोत्सवाचे आयोजन केले आहे. सदर महोत्सवामध्ये आगाशी-उंबरगोठण विभागातील आपल्या वाडवळ भगिनी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावतात आणि त्याच सोबत क्रिकेट सामन्यांमध्ये सहभागी होतात. आपणा सर्वांना विनंती आहे की आपण सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून खाद्य पदार्थांचा आस्वाद घ्यावा तसेच सोबत रोमहर्षक क्रिकेट सामन्यांचा आनंद घ्यावा.