" विठ्ठल मंदिर ग्राहक संघ " रौप्य महोत्सवी वर्ष आशियातील सर्वात मोठी ग्राहक संघटना असलेल्या मुंबई ग्राहक पंचायतीशी सलग्न असलेल्या आपल्या माहिम येथील "विठ्ठल मंदिर ग्राहक संघाच्या" रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विठ्ठल मंदिर येथील ग्रामस्थ बंधु भगिनींनी विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरात २५ सुपारी रोपांचे रोपण करण्यात आले. नोव्हेंबर २००० मध्ये राजेश वर्तक यांच्या पुढाकाराने विठ्ठल मंदिर ग्राहक संघांची स्थापना करण्यात आली . सुरूवातीला ह्या संघामध्ये २१ सभासद होते . पुढील वर्षी आणखीन सभासद संख्येमध्ये बरीच वाढ झाली. त्यानंतर माहीम, केळवे, सफाळे ,शिरगाव , पालघर भागातही मोठ्या संख्येने संघवाढ झाली. कालांतराने संघ प्रमुखांना काम करण्यास सोपे जावे म्हणून विठ्ठल मंदिर संघाचे प्रत्येक आळी प्रमाणे विभाजन करून पाच संघ करण्यात आले . या प्रत्येक ग्राहक संघांची जबाबदारी यशवंत वर्तक, किशोर पाटील, नंदकुमार पाटील,उन्मेष सावे, राकेश वर्तक,संजय गहला(घोरली पाडा)खूप मेहनत घेऊन आणि प्रामाणिकपणाने पार पाडत आहेत. ग्राहक संघासाठी गावातील अनेक व्यक्तींनी चांगले योगदान लाभले आहे,आपणांस खूप खूप धन्यवाद! 🙏