कांडलई (वसई) गावातील सौ. कविता दर्शित चौधरी यांच्या समाजकार्याची दखल घेऊन जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांना आणखी एक राज्यस्तरीय सन्मान *तुषार प्रकाशन वसई* तर्फे आज बहाल करण्यात आला आहे. त्यांच्या कार्याची सीमा केवळ आपल्या समाजापुरती सीमित नसून अवघ्या महाराष्ट्रात त्यांचे आरोग्य सेवेचे काम अविरत सुरु असते. त्या बद्दल त्यांचे आभार आणि सो. क्ष. समाजातर्फे पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉